पाटोदा,सोनखेड व केंद्रेवाडी या गावी शेतकऱ्यांना प्रत्येकी आकरा हजारांची मनसे मदत

पाटोदा,सोनखेड व केंद्रेवाडी या गावी शेतकऱ्यांना प्रत्येकी आकरा हजारांची मनसे मदत

जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांचे शेतकरी मदत अभियान

अहमदपूर (गोविंद काळे) : कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे हे पेरणीमध्ये हातभार म्हणून आकरा हजार रुपयांची मदत आपल्या “चला देऊ मदतीचा हात कोविडमुळे मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबाच्या जीवनात”या मोहिमे अंतर्गत गावोगाव फिरून,कुटुंबियांची भेट घेऊन घरपोच करत आहेत.पाटोदा येथील स्व.रमेश त्र्यंबक खाडे, सोनखेड येथील स्व.रघुनाथ पंढरी घोटमुकले,कोपरा येथील स्व.भानुदास विठ्ठल देपे हे कर्ते शेतकरी अचानक कोविड महामारी मध्ये मृत्यू पावले व त्यांच्या कुटुंबियांना पदोपदी अडचणींचा सामना करावा लागला.त्यातच आता पेरणीमध्ये बीबीयाने,खत,पेरनिखर्च यामुळे हे कुटुंब मेटाकुटीला आली असताना मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह यांनी या कुटुंबांना त्यांच्या घरी भेट देत आधार दिला व कुठल्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे हे सांगत तिन्ही गावातील त्या शेतकरी कुटुंबातील संदीप खाडे,पंढरी घोटमुकले,भीमाशंकर देपे यांना प्रत्येकी आकरा हजार रुपयांची मदत केली.काही दिवसांपूर्वीच डॉ भिकाणे यांनी शेडोळ व मानखेड येथेही शेतकरी कुटुंबाला अशीच मदत केली होती.

कोरड्या आश्वासनानपेक्षा छोटीसी मदत माणुसकीची – डॉ. भिकाणे
कोविड महामारी मध्ये अपरिमित हानी झाली असून ती कशानेही भरून निघणार नाही परंतु अश्या कुटुंबांना गरज आहे ती मानसिक व आर्थिक आधाराची त्यामुळे मी त्या कुटुंबांना भेट देऊन त्यांना छोटीसी मदत करत आधार देण्याचा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया डॉ नरसिंह भिकाणे यांनी दिली. यावेळी यश भिकाणे, उल्हास पाटील, उत्तम पाटील, अतिष गायकवाड, गजानन पांगरे आदी मनसे कार्यकर्ते तसेच पाटोदा येथे बालाजी केंद्रे, प्रभू खाडे, उत्तम खाडे, महेश मुंडे सोनखेड येथे प्रकाश बरुरे, विक्रम नारागुडे, पांडुरंग करपुडे, संतोष नारागुडे, वसंत सारुळे कोपरा येथे मदन पलमटे,बाबूराव पलमटे, किशनराव कासले, माधव देपे आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!