नुतन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा माजी मंत्री विनायकराव पाटील व माजी आ. बब्रुवान खंदाडे यांनी केला सत्कार
अहमदपूर( गोविंद काळे ) : महाराष्ट्र राज्याचे नुतन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची आज मुंबई येथील सागर निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील व माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे यांनी सदिच्छा भेट घेऊन यथोचित सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्याबरोबर मराठवाडा नदीजोड प्रकल्प,जलयुक्त शिवार योजना पुनःचालू केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
तसेच सम्रद्धी महामार्गाच्या उदघाट्नासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निमंत्रित केल्याबद्दल व महाविकास आघाडी सरकार मधील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी सरकार पायऊतार होत असताना घाईघाईने कोट्यवधी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली होती त्या सर्व निधीला स्थगिती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करुन अहमदपुर व चाकुर तालुक्यातील गेल्या दोन तीन वर्षांमधील राहीलेल्या विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासी सविस्तर चर्चा करण्यात आली. सदरील सदीच्छा भेटीच्या शिष्टमंडळात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, यांच्या सह नगरसेवक राहुल शिवपुजे, अँड. निखिल कासनाळे, अमोल निडवदे हे उपस्थित होते.
