बिरला इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील बिरला ओपन माईंड इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि. 10 जुलै रोजी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. पावसाच्या वातावरणात सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांनी दिंडी मध्ये सहभागी होऊन भरघोस आनंद घेतला.
आषाढी एकादशी निमित्त दिंडी चे आयोजन करण्यात आले होते यामुळे शाळा च्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर छोट्या वारकऱ्यांनी माऊली माऊली या गाण्यावर नृत्य सादर केले. तर मोठ्या वारकऱ्यांनी नृत्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी सुंदर असे अभंग सादरीकरण केले तसेच शिक्षक विद्यार्थ्यांनी फुगडीच्या ठेक्यावर नृत्य सादर केले. दिंडी समाप्ती नंतर प्राचार्य अभय सोनटक्के यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणि पालखीची पूजा करून महाआरती करण्यात आली. यासर्व कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी आनंदाच्या वातावरणात सहभाग नोंदवला.
