जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी
मतदार यादी कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी<br>मतदार यादी कार्यक्रम जाहीर

लातूर (प्रतिनिधी) : राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र यांचे दि. 06 जूलै 2022 रोजीच्या आदेशा अन्‍वये लातूर जिल्ह्यातील जिल्‍हा परिषद व त्‍यांअतर्गत असलेल्‍या पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्‍याचा कार्यक्रम दिलेला आहे. सदरील कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

निवडणुकीचा टप्पा व टप्पा सुरु करण्याची / पुर्ण करण्याची तारीख पूढील प्रमाणे आहे.मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 31 मे 2022, राज्‍य निवडणुक आयोगाने अधिसुचि‍त केलेल्‍या तारखेस अस्तित्‍वात असलेल्‍या विधानसभेच्‍या मतदार यादीवरुन जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सुचना मागविण्‍याकरीता प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 18 जूलै 2022, मतदार यादीसंदर्भात हरकती व सुचना दाखल करण्‍याचा अंतिम दिनांक 22 जूलै 2022, निवडणुक विभाग व निर्वाचक गणाच्‍या छापील मतदार यादया अ‍धिनियमाच्‍या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्‍याची तारीख 29 जूलै 2022, निवडणुक विभाग व निर्वाचक गणांच्‍या छापील मतदार यादया माहितीसाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत, याबाबतची सुचना प्रसिध्‍द करण्याची तारीख 29 जूलै 2022 व मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे दि. 08 ऑगस्ट 2022 असा आहे.

वरील मतदार यादी कार्यक्रम राबविणेसाठी त्‍या-त्‍या तालुक्‍याचे तहसिलदार यांना प्राधिकृत करण्‍यांत आलेले आहे व नियंत्रण अधिकारी म्‍हणुन संबंधित उपविभागीय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

About The Author

error: Content is protected !!