खरेदी विक्री संघात भाऊसाहेबांना विनम्र अभिवादन
उदगीर : येथील स्व. रामचंद्रराव पाटील तळेगावकर सह. खरेदी विक्री संघ येथे सहकार महर्षी रामचंद्रराव विठ्ठलराव पाटील तळेगावकर यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन संघामध्ये भाऊसाहेबांना पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात आली. तसेच या प्रसंगी संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले यांच्या संकल्पनेतून जेष्ठ संचालक विठ्ठलराव मुळे मामा यांच्या हस्ते डिजीटल बिलींग साठी नवीन संगणक विभागाचे उघ्दाटन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, संचालक बाबासाहेब काळेपाटील, विठ्ठलराव मुळे, प्रभाकर पाटील व तसेच भालचंद्र घोनसीकर, बाळासाहेब नवाडे, बालाजी परगे, विजय येडले, युवराज कांडगीरे संघाचे व्यवस्थापक शिवाजी कवडे व कर्मचारी उपस्थित होते
