आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवणार असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन तथा चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे केले . ते आज दि. 13 जुलै रोजी आयोजित लक्ष्मीनारायण मंदिर मंगल कार्यालय, अहमदपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते . यावेळी व्यासपीठावर प जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, माजी सभापती ॲड.टी.एन कांबळे, बाळासाहेब पाटील आंबेगावकर, ॲड. भारतभूषण क्षीरसागर, राजाभाऊ शिंदे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी सभापती शिवाजीराव खांडेकर, शहराध्यक्ष अजहरभाई बागवान, बालाजी बैकरे, दिपकभाऊ शिंगडे, युवक जिल्हा कार्यध्यक्ष प्रशांत भोसले, युवक ता.अध्यक्ष दयानंद पाटील, डी.के जाधव, महिला शहराध्यक्ष सौ शाहुताई कांबळे, जिल्हा सरचिटणीस इमोरज भाई पटवेकर, ॲड. सादिक शेख, सचिन पडिले, तानाजी राजे, फेरोज शेख, आशिष तोगरे, युवती, महिला, युवक सेल, सामाजिक न्याय विभाग, ग्रंथालय, सेवादल व सर्व सेल पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवावा यासाठी ‘ वन बूथ २५ युथ ‘ मोहिमेला गती देण्याबाबत तसेच सभासद नोंदणी कार्यक्रमाला व्यापक स्वरूप देण्यात यावे. यावेळी अहमदपूर शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती सुद्धा घेतल्या.
