इनरव्हील क्लब उदगीर तर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय वस्तूंचे वाटप

इनरव्हील क्लब उदगीर तर्फे गुरुपौर्णिमेच्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय वस्तूंचे वाटप

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील इनरव्हील क्लबच्या वतीने गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने संस्कार विद्यालय, उदगीर येथील शालेय १०० विद्यार्थ्यांना ४०० वह्यांचे वाटप करण्यात आले.या वेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ मीरा चंबुले ,उपाध्यक्ष सौ स्वाती गुरुडे, एडिटर सौ पल्लवी मुक्कावार ,आय एस ओ स्नेहलता चणगे आणि सदस्य सौ पल्लवी कुलकर्णी,सौ रोहिणी चाटे याच बरोबर शाळेचे मुख्याध्यापक मा श्री हरकरे एम.जी कलबुर्गे, मठपती,श्रीमती केंद्रे यांची उपस्थिती होती.यासाठी प्रोजेक्ट प्रमुख सौ राखी सुगंधी होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संस्कार विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती सुवर्णा मजगे यांनी केले तर गुरू पौर्णिमा का साजरी केली जाते याबद्दल अप्रतिम माहिती व आभार प्रदर्शन श्री.मन्मथ मोंडे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!