१२९ गावासाठी कायमस्वरूपी नळाद्वारे पाणी मिळणार
माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या प्रयत्नाला यश
उदगीर (प्रतिनिधी) – उदगीर विधानसभा मतदार संघातील उदगीर व जळकोट तालुक्यातील 129 गावासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 480 कोटी रुपयांची कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची योजना शासनाने मंजूर केली आहे. या योजनेसाठी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केलेल्या प्रयत्नाला यश मिळाले असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की उदगीर जळकोट तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांची साठी कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होता. मात्र गेल्या अडीच वर्षापासून या प्रयत्नांना खीळ बसली होती राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व भाजपाचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची भेट घेऊन त्यांना पाठपुरावा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सादर केलेला व गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला आराखडा मंजूर करून घेण्यासाठी माजी आमदार सुधाकर भालेराव यांना यश आले आहे.
उदगीर व जळकोट तालुक्यात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे नसल्याने पाणी आणायचे कोठून हा प्रश्न निर्माण झाला होता माजी आमदार भालेराव यांच्या प्रयत्नाने दोनशे कोटी रुपयाची उदगीर शहरासाठी मंजूर करण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची अटल अमृत योजना अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहे त्याचं स्वतः उदगीर मतदार संघातील 129 गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी नळाद्वारे शुद्ध पाणी देण्याची योजना मंजूर झाली असून लवकरात लवकर त्याची कामे पूर्ण होऊन गाव पातळीवरील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणार आहे हे असेही यावेळी श्री पाटोदे यांनी सांगितले आहे.
कृपया ही बातमी प्रसिद्ध करून सहकार्य करावे
आपला बाळासाहेब पाटोदे
भाजपा युवा मोर्चा
तालुकाध्यक्ष उदगीर
