पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्याने राज्‍यातील सामान्य जनतेला दिलासा – भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांची प्रतिक्रिया

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केल्याने राज्‍यातील सामान्य जनतेला दिलासा - भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांची प्रतिक्रिया

लातूर (प्रतिनिधी) : पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे ५ आणि ३ रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी स्वागत केले आहे.

एका प्रसिद्धी पत्रकात आ. रमेशअप्‍पा कराड यांनी म्हणाले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली. त्याचवेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात सत्तेत असलेल्या मागील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करावी अशी मागणी सातत्याने केली होती. केंद्र सरकाच्या निर्णयाचे अनुकरण करत भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या देशातील इतर राज्य सरकारांनी इंधनावरील करात कपात केली मात्र महाविकास आघाडी सरकारने मात्र इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या-आल्या इंधनावरील व्हॅटमध्ये कपात करत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आहे, असेही आ. रमेशअप्‍पा कराड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्याचे नवे पर्व महाराष्ट्रात सुरू झाले असून ‘सबका साथ, सबका विकास’ हा पंतप्रधान मोदी यांचा मंत्र श्री. शिंदे व श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती देईल असा विश्वास भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी व्यक्त केला.

About The Author

error: Content is protected !!