दयानंद कला महाविद्यालयात शैक्षणिक संवाद संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : येथील दयानंद कला महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020’ च्या अनुषंगाने शैक्षणिक संवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आयर्लंड येथील प्रा. डॉ. एश्वर्या पाटील संस्थापक, संचालिका ॲस्ट्रल एज्यूकेशन, लि. बेलफास्ट, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी त्यांनी पाश्चात्य देशातील शैक्षणिक पध्दतीबद्यल सविस्तर माहिती सांगितली. शैक्षणिक धोरण निश्चित करतांना त्यामध्ये शिक्षकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असतो. असे त्यांनी नमुद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड सर यांची उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे IQAC प्रमुख डॉ. साळुंके एस.व्ही., नॅक समन्वक डॉ. मान्नीकर पी.एम, समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जोशी ए.बी. आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.
भारतीय शिक्षण पध्दती ही चांगलीच आहे त्यास आणखीन चांगले कसे करता येईल यावर सर्वांनी भर देणे आवश्यक आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जोशी ए.बी. तर सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. आदमाने बी.बी. यांनी केले.
