सुवर्णबिंदू प्राशन शिबिर संपन्न
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील मोजे डोंगरशेळकी येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल उदगीर तालूका आणि शतायु आयुर्वेद उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्य नक्षत्रानिमित्त 0 ते 16 वर्ष वयोगटातील बालकांची रोग प्रतिकार शक्ती,बुद्धी तल्लख राहण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रोक्त विधिनुसार बनविलेले सुवर्णबिंदू प्राशन शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटक म्हणून पंचायत समितीचेमाजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले तर अध्यक्षस्थानी सरपंच सौ नागरबाई व्यंकटराव कांबळे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच गणपत पवार,प्रा.शाम डावळे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ भाग्यश्री घाळे, नरसन मरेवाड,समाधान कांबळे,राहुल गजभारे,राजू पुंड,आकाश मरलापल्ले, विष्णू बरुरे होते.
कोव्हिडची तिसरी लाट आली तर लहानमुलांना धोका होऊ शकतो,त्यापूर्वी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी,त्यांनाहि लसिकरणाप्रमाणे सुरक्षा कवच मिळावे, या हेतुने हे शिबिर आयोजीत करण्यात आले होते.
या शिबिरात गावातील आणि तांड्यावरील एकूण 357 बालकांना आरोग्यवर्धक डोस पाजविण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका दैवशाला बिरादार,अनुसया राठोड,सुशीला केंद्रे आशा कार्यकर्त्या मीरा सुवर्णकार,म्हादाबाई कांबळे यांनी परिश्रम घेतले.
