श्रीकांत पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीला गती येणार – वैशालीताई मोटे
उदगीर (एल.पी. उगिले) : संघटन कुशल नेतृत्व श्रीकांत पाटील यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला असल्याने त्यांच्या जनसंपर्काचा निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल. महिला आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. मीनाक्षीताई शिंगडे यादेखील पूर्ण ताकदीनिशी कामाला लागल्या असल्यामुळे फक्त उदगीर विधानसभा मतदारसंघातच नव्हें तर संपूर्ण लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला गती येणार आहे. असे विचार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या विभागीय अध्यक्ष सौ. वैशालीताई मोटे यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर येथे आल्या असता श्रीकांत पाटील यांच्या घरी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
भूम परांडा वाशीचे आमदार राहुलभैया मोटे यांच्या सुविद्य पत्नी तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वैशालीताई मोटे कार्यकर्त्यांना संबोधन करत होत्या. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या लातूर जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई शिंगडे, उदगीर शहराध्यक्ष दिपाली ताई सौ.दिपालीताई औटे, शहराध्यक्ष अभिजीत औटे, युवा नेते श्रीकांत पाटील, जवाहरलाल कांबळे, युवक शहराध्यक्ष अजय शेटकर, विशाल हाळीकर, जय सोनवणे, कल्याण बिरादार, गंगाधर बिरादार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष शफी हाशमी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष सय्यद इरफान, सामाजिक न्याय विभागाचे प्रदीप जोंधळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख अभिजीत औटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणायला की, उदगीर विधानसभा मतदारसंघात सध्या संघटनात्मक बांधणीला चांगली गती येत असून आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकावर असणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका असतील. प्रत्येक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे आणण्यासाठी युवक आघाडी सोबतच महिला आघाडी देखील अग्रेसर राहणार आहे.
त्यामुळे येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री तथा उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजयजी बनसोडे यांनी विकासाची गंगा मतदारसंघात आणून मतदार संघाचा कायापालट केला आहे. यामुळे उदगीर विधानसभा मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनू शकेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या तत्त्वाची जाण ठेवून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या जाणिवेने आमदार संजय बनसोडे हे काम करत आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता निश्चितच सतत वाढत चालली आहे.
आमदार संजय बनसोडे यांच्या विकास कार्यामुळे पक्षाला बळ आले आहे. तसेच पक्ष संघटनेची बांधणी देखील मजबूत होत असल्याने सर्वसामान्य माणूस देखील त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा वैशालीताई मोटे यांच्या उदगीर शहरात विविध ठिकाणी गाठीभेटी झाल्या.
त्यांनी महिला आघाडीची बैठकीही महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष दिपालीताई औटे यांच्या संपर्क कार्यालयातही बैठक घेऊन महिलांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेची जाण करून दिली. तसेच विकासाची क्षमता आणि सर्वसामान्य माणसाला घेऊन चालण्याची धोरणे हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी महिलांनी खंबीरपणे उभे राहावे. असेही आवाहन त्यांनी केले.
या बैठकीचे प्रास्ताविक राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा उर्मिलाताई वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन शहराध्यक्षा दिपालीताई औटे यांनी मानले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सत्यवती गायकवाड, हुसना बानू शेख, रत्नप्रभा खादीवाले, शशिकला चव्हाण, शहर उपाध्यक्ष किशाबाई कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होत्या.
