बिनविरोध निवड झालेल्या किनीकदू सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकाचा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

बिनविरोध निवड झालेल्या किनीकदू सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकाचा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या मौजे किनीकदू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते नुकताच नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार संपन्न झाला.येथील शासकीय विश्रामगृहात किनीकदू येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचित सर्व संचालकांचा सत्कार सोहळ्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील,सिनेट सदस्य अँड.युवराज पाटील, रामभाऊ बेल्लाळे, अँड.अमित रेड्डी, गोविंदराव गिरी, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, देविदास सुरनर, सुखदेव कदम, संगम कुमदळे, यांच्या सह किनीकदूचे सरपंच संजय भुरे, उपसरपंच व्यंकटराव तुडमे, नुतन संचालक प्रभाकर तरगुडे, बळीराम तुडमे, मारोती भुरे, भगवंत भुरे, अंकुश तुडमे, काशिनाथ हिप्पळगावे, विजय तुडमे, व्यंकट तुडमे, भगवान गिरी,माधव गुडमे, संभाजी तुडमे, बालाजी मुरडे, शिवदास भुरे, चंदन गिरी, नरसिंग मटके यांच्या सह किनीकदू येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!