बुद्ध विचारातच मनुष्याचे कल्याण आहे – भिक्खु महावीरो

बुद्ध विचारातच मनुष्याचे कल्याण आहे - भिक्खु महावीरो

अहमदपूर (गोविंद काळे) : विज्ञानवादी धम्माची शिकवण जगात शांतता प्रस्थापित करणारी असल्याने आणी धम्मातच जगाच्या कल्याणाचा विचार असल्याने बुध्द विचारातच जगाचे कल्याण आहे असे प्रतिपादन बौध्द धम्म गूरू भंते महाविरो थेरो यांनी केले. मौजे काळेगांव ता. अहमदपूर येथे तक्षशिला बौध्द विहार येथे आयोजित वर्षावास सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते धम्म देसना देताना बोलत होते.या वेळी धम्म पिठावर भिक्कू सरणंकर आणी श्रामणेर राहूल, श्रामनेर सोनूत्तर यांची उपस्थिती होती. सूरूवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्पाने धूपाने आणी दीपाने पुजा करण्यात आली. येथील उपस्थित बौध्द उपासक उपासिका यांना भंते सरणंकर यांनी त्रीशरण पंचशिल दिले.या सोहोळ्यासाठी आवर्जून उपस्थित उपस्थित असलेले प्रा.डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित उपासकांना शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रा.डी.बी.शिंदे, माधवराव तिगोटे,मनोज मून्ना कांबळे,घनगाव साहेब, वाघमारे सर माळेगांवकर, हिरामन धसवाडीकर, पंढरी वाघमारे आदींची उपस्थिती होती.पूढे बोलताना भंते महाविरो म्हणाले की, शुध्द आचार विचार नितीमत्ता असने म्हणजे बौध्द धम्म होय. मनुष्य हा जन्माने नव्हे तर आपल्या कर्माने श्रेष्ठ ठरतो त्यामूळे नेहमी कुशल कर्म करत रहाणे गरजेचे आहे. या वेळी भन्ते सरणंकर बोलताना म्हणाले की, मानवी जीवनाची उन्नती ही बूध्द धम्माच्या आचरणावर अवलंबून आहे.बौध्द धम्म हा अथांग करुणेचा सागर आहे. या पवित्र धम्माच्या सानिध्यात कायम रहावे असे अवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकूर शिंदे यांनी केले तर आभार शिवराम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी रेखा शिंदे मॅडम, ललीताबाई कांबळे, कूसूम तिगोटे, वंदना मसूरे, सिध्देश्वर मस्के, कैलास गायकवाड, नितीन सरकाळे आदींनी पूडकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!