जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द
मतदार यादी संदर्भात हरकती, सुचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालयात वेळेत सादर करावेत
लातूर (प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे आदेश क्र.रानिआ/जिपपंस-2022/प्र.क्र.11/का.7 दि 6 जूलै 2022 अन्वये लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम दिलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकासाठी प्रारुप मतदार यादी दिनांक 18 जूलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्व तहसिल कार्यालय इत्यादी ठिकाणी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
याव्दारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्रारुप मतदार यादीचे आवलोकन करावे. व मतदार यादीसंदर्भात हरकती / सुचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय / संबंधित तहसील कार्यालयामध्ये दिनांक 22 जूलै 2022 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
