जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

जिल्ह्यातील युवकांसाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

पात्र उमेदवारांनी 31 जूलै पर्यंत संकेतस्थळावर अर्ज करावेत

लातूर (प्रतिनिधी) : पुणे येथील मुख्यालय, सैन्य भरती कार्यालया मार्फत दि. 23 ऑगस्ट 2022 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे व सोलापूर या सहा जिल्ह्यातील नवयुवकांसाठी अग्निवीर सैन्य भरती मेळावा राहुरी (अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित केलेला आहे.

या करीता पात्र उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी दिनांक 31 जुलै 2022 पर्यत करावी. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल व अग्निवीर ट्रेड्समॅन या पदांसाठी भरती घेतली जाणार आहे.

तरी लातूर जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी नमुद संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून सदरील सैन्य भरती मेळाव्यात सहभाग नोंदवून घ्यावा असे  आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, लातूर करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!