अण्णाभाऊंचे साहित्य हे जागतिक कीर्तीचे – प्रा.रत्नाकर नळेगावकर
अहमदपूर (गोविंद काळे) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे जागतिक कीर्तीचे साहित्य असून त्यात समाजातील वंचित, उपेक्षित व दुर्लक्षित समाजाचे प्रतिबिंब आढळते असे प्रतिपादन प्रा.रत्नाकर नळेगावकर यांनी केले.येथील लसाकमच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा ५३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लसाकमचे जेष्ठ मार्गदर्शक बी.एम.जंगापल्ले तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे युवा नेते व्यंगचित्रकार चंद्रशेखर भालेराव, लसाकमचे उपाध्यक्ष गणेश वाघमारे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना नळेगावकर म्हणाले की, जगातील २७ भाषांमध्ये अण्णाभाऊच्या साहित्य भाषांतरीत झाले असून सर्वच ठिकाणी हे साहित्य आवडीने वाचले जाते. मराठी साहित्यात तर ही फार मोठी उपलब्धी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष राजकुमार गोंटे यांनी तर सुत्रसंचालन जिल्हा प्रवक्ते नरसिंग सांगवीकर व आभार आयोजक सुग्रीव बेले यांनी मानले.
