दयानंद कला महाविद्यालयात एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्राचे वाटप

दयानंद कला महाविद्यालयात एनसीसी ‘बी’ प्रमाणपत्राचे वाटप

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांमध्ये शील, शिस्त, संयम, निर्णयक्षमता, बुद्धी, एकोपा, समानता, राष्ट्राभिमान, उच्चविचारसरणी, ध्येयनिष्ठा, समयनिष्ठता, आज्ञाधारकपणा, इत्यादी गुणांचा विकास व्हावा यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना कार्य करते. सोबतच असे गुणी छात्र सैन्यात भरती करता यावेत यासाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. राष्ट्रीय छात्र सेना देशपातळीवर तीन प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन करते. महाविद्यालयीन स्तरावर २ वर्षांचे प्रशिक्षणांती बी प्रमाणपत्र परीक्षा घेतली जाते व उत्तीर्ण छात्रांना बी प्रमाणपत्र मिळते.

दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागातील कॅडेट्सने बी प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. महाविद्यालयातील 13 कॅडेट्सनी बी प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले आहे. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते बी सर्टिफिकेट प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष आरविंद सोनवणे, ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्तसचिव सुरेश जैन व कोषाध्यक्ष संजय बोरा आदीनी कौतुक केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ प्रदीप सूर्यवंशी, लेफ्टनंट विवेक झंपले, प्रा महेश जंगापल्ले, कार्यालयीन अधिक्षक नवनाथ भालेराव इत्यादींनी कॅडेट्सचे अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!