मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा गांधी महाविद्यालय परिसरातील मुतारीच्या असलेल्या लोखंडी चॅनल गेटला भगव्या उपरणेच्या साह्याने गळफास घेऊन एका मुलाने आत्महत्या केली आहे. रामचंद्र उर्फ निशांत नारायण कोनाले वय १९ वर्ष रा. थोट सावरगाव ह. मु.नंदनवन कॉलनी अहमदपूर असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना १९ जूलै रात्री ७ वाजेच्या सुमारास मित्राला भेटून येतो आसे सांगून घरातून निघून गेला २० जूलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या पूर्वी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या परिसरातील असलेल्या मुतारीच्या लोखंडी चॅनल गेटला भगव्या रंगाच्या उपरणेच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असे मयताचे काका मन्मथ ईश्वर कोनाले यांनी पोलीसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या बाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की २० जूलै रोजी सकाळी ७ वाजण्याच्या पूर्वी महात्मा गांधी महाविद्यालय परिसरात मुतारीच्या लोखंडी चॅनल गेटला मुलाने भगव्या रंगाचे उपरणेच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस निरिक्षक चितांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक रामचंद्र केदार, पि एस आय प्रभारक अंधोरीकर पोलीस नाईक तानाजी आरदवाड पोलीस नाईक संतोष ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पूढील तपास पोलीस नाईक संतोष ठाकरे हे करत आहेत.
