ओबीसी आरक्षण मिळाल्याने अहमदपूरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष
अहमदपुर (गोविंद काळे) : गेल्या काही वर्षांपासून ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झालं होतं आज अखेर सुप्रिम कोर्टाने ओबीसींचे आरक्षणाचा निर्णय दिल्याने अहमदपुर मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सवात साजरा करण्यात आला. अहमदपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,वि.दा.सावरकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ओबीसी आरक्षण मिळाल्याने अहमदपूर शहरातील सर्व चौकात फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करुन पेढे वाटण्यात आले. नव्याने स्थापन झालेल्या भाजप व शिवसेना युतीच्या सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण संदर्भात भक्कम बाजू मांडल्यानंतर आज महाराष्ट्रातील ओबीसींला राजकीय आरक्षण मिळाल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहमदपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.
यावेळी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य, अशोकराव केंद्रे, माजी सभापती अँड.आर.डी.शेळके, ज्ञानोबा बगगिरे, कमलाकर शेकापुरे, भाजपचे अध्यक्ष हणमंत देवकते, माजी उपसभापती निळकंठ पाटील राजकुमार खंदाडे, गोविंदराव गिरी,कुलदिप हाके, देविदास सुरनर, माजी पंचायत समितीचे सदस्य रामभाऊ नरवटे, माणीक नरवटे, बालाजी गुट्टे, संग्राम नरवटे,बाळु मुंडे, नगरसेवक राहुल शिवपुजे, अँड, निखिल कासनाळे, अँड.किशोर कोरे, महेश बिलापटे, हणमंत बडगिरे, दत्ता जमालपुरे, गोविंद बैकरे, गोविंद बैकरे, राजकुमार पाटील ,सुखदेव कदम, गजेंद्र वलसे, सतिश मुसणे, शेषेराव राठोड, जुगलकिशोर शर्मा,बाळू वलसे, रामदास मुंडे, पांडुरंग गलाले, नामदेव कलमे, अमोल पाटील, रामानंद मुंडे, नागनाथ दहिफळे, इंद्रजित मोरे, बाळासाहेब आकनगिरे, संगम कुमदळे, आसीफखाॅ पठाण यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
