डॉ. दिलीप नागरगोजे यांनी आईची द्वितीय पुण्यतिथी २१ मुलींचे शैक्षणिक शुल्क भरून केली साजरी
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयातील पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे यांच्या मातोश्री स्वर्गीय चंप्पाबाई नामदेव नागरगोजे यांचे मौजे महाळंग्रावाडी येथे वृद्धापकाळाने दि.14 जुलै 2020 रोजी दुःखद निधन झाले होते. तिथीनुसार द्वितीय पुण्यतिथी शनिवार दि.23 जुलै 2022 रोजी पारंपरिक पद्धतीने पुजन करून साजरी केली. या कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चाची रक्कम महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत असलेल्या गरजू व होतकरू अशा एक्केवीस विद्यार्थिनींचे वार्षिक शैक्षणिक शुल्क भरून डॉ. दिलीप नागरगोजे व सौ.रेश्मा नागरगोजे यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने पुण्यतिथी साजरी केली. सदरील 21 विद्यार्थ्यीनींचे शैक्षणिक शुल्क 17661 रुपये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड व उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, चि.श्रीनिवास व चि.ओम नागरगोजे, अधिक्षक नवनाथ भालेराव, डॉ गोपाल बाहेती, प्राध्यापिका अंजली बनसोडे, प्राध्यापिका शांता कोटे, डॉ. सुभाष कदम, प्रा.सुरेश क्षिरसागर, प्रा.विलास कोमटवाड, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. विवेक झांपले , श्री.व्यास एस.आर., श्री सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
डॉ.दिलीप नागरगोजे यांच्या उपक्रमाचे दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, सचिव रमेशजी बियाणी, शालेय समिती अध्यक्ष ललितभाई शहा, संयुक्त सचिव मा. सुरेशजी जैन यांनी कौतुक केले.
