महात्मा फुले महाविद्यालयात लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आजाद यांची जयंती साजरी करण्यात आली.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची व थोर स्वातंत्र्य सेनानी शहीद चंद्रशेखर आजाद यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी हे होते तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी डॉ. डी. एन. माने, डॉ. सचिन गर्जे, डॉ.संतोष पाटील, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.