महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती वर्धापन दिन साजरा

निलंगा (प्रतिनिधी) : 22 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या स्थापना दिवस शिक्षक समिती शाखा निलंगा तर्फे साजरा करण्यात आला. 22 जुलै 1962 रोजी पुणे येथील कै. भा वा शिंपी गुरुजी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ची स्थापना झाली अन्यायाची चिड न्यायची चाड शिक्षण- शिक्षक बालक यांची पक्षपाती हे ब्रीद घेऊन शिक्षक समिती गेल्या साठ वर्षापासून महाराष्ट्रात शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यशील असते आज शिक्षक समिती चा हिरक महोत्सवी वर्ष निलंगा शाखेने ग्रामीण रुग्णालय निलंगा येथे रुग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला त्याप्रसंगी शिक्षक समितीचे अनेक पदाधिकारी हजर होते त्यावेळी बालाजी येळीकर संजय सूर्यवंशी पी जी बिरादार संजय कदम जढाळे सर सुनील टोम्पे सहदेव माने सुरेश जाधव इनामदार के जी राऊत सीएम लखन ए डी एम तानाजी सावंत भास्कर सोळुंके बीजी वाघमारे मेश्राम श्याम महिला पदाधिकारी श्रीमती धानोरे बी बी श्रीमती पाटील अन्नपूर्णा तसेच निलंगा पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके व इतर अनेक पदाधिकारी हजर होते त्याप्रसंगी शिक्षक समितीची भूमिका शिक्षक समितीचे कार्य सोडविलेले प्रश्न अरुण सोळुंके व संजय कदम यांनी मांडली.ग्रामिण रुग्णालयातील डाँक्टर पाटील, डाँ कु राऊत व डाँ सौदंळे यांचे सहकार्य लाभले.

About The Author