पत्रकार गजानन भुसारे यांचे निधन

पत्रकार गजानन भुसारे यांचे निधन

अहमदपूर : येथील दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी तथा शांतीनिकेतने शिक्षकांची वेतनधारी पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन गुरुनाथप्पाभुसारे वय ५० वर्ष यांचे ब्रेन स्ट्रोकच्या आजाराने २४ जूलै रोजी रविवारी सकाळी लातूर येथे एका खाजगी रुग्णालयामध्ये निधन झाले. ३०जून रोजी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने ते कोमात गेले होते. त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर २४ जूलै रोजी दुपारी १ वाजता त्यांच्या मूळ गावी येरोळ ता. शिरूर अनंतपाळ येथे लिंगायत स्मशानभूमि मध्ये शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार असून अहमदपूर पंचायत समितीच्या ग्रामविस्तार अधिकारी विजया रोडगे- भुसारे यांचे पती तर येरोळचे पत्रकार शिवानंद भुसारे यांचे ते जेष्ठ बंधू होत.

About The Author

error: Content is protected !!