तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील थोडगा रोड वरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभाग्रहात घेण्यात आलेल्या बैठकीत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाअध्यक्ष यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टीत नुकताच जाहीर प्रवेश केला याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत शहरातील थोडगा रोड वरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभाग्रहात जिल्हाअध्यक्ष प्रताप भोसले यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते बाबुराव जंगापल्ले, सुधाकर चोले, संभाजी जाधव, दत्ता हंगरगे , माधव पोतवळे, नंदकुमार आरदवाड, सुरेश जंगापल्ले , विठ्ठल तरूडे , तुषार बेले, खंडु मोहाळे, नरहरी पोतवळे , आदी सह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रताप भोसले यांनी आम आदमी पक्षाच्या गेल्या सात वर्षांतील राजकीय वाटचालीचे विश्लेषण करून पंजाब विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातूनही पक्षात इनकमिंग वाढल्याकडे लक्ष वेधले. 2024 मध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्रात दमदारपणे उतरणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करून अहमदपूर तालुक्यावर विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले अहमदपूर तालुक्यातील नागरिकांनी विधानसभा मतदार संघात सर्वच राष्ट्रीय, प्रादेशिक राजकीय पक्षांना आलटून पालटून संधी दिली. मात्र सर्वांकडूनच त्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. आम आदमी पार्टीच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी अगोदर दिल्ली आणि त्यापाठोपाठ पंजाबमध्ये लोककल्याणकारी तसेच लोकाभिमुख राज्यकारभार चालविल्याचे दिसून आल्याने महाराष्ट्रही प्रभावित झाला आहे. सध्या तालुक्यात आम आदमी पक्षाला अनुकूल स्थिती निर्माण झाली असून आगामी विधानसभा तसेच नगरपालीका निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार दाखवून देणार असल्याचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांनी सांगितले.