माजी मंत्री आ.अमित देशमुख यांची ग्रामविकास अधिकारी सल्लाउद्दीन शेख यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती

माजी मंत्री आ.अमित देशमुख यांची ग्रामविकास अधिकारी सल्लाउद्दीन शेख यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती

नव वधू-वरांना दिल्या शुभेच्छा

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज सोमवार दि. २५ जुलै रोजी सकाळी लातूर शहरातील दिवाणजी मंगल कार्यालय येथे आर्वीचे ग्रामविकास अधिकारी सल्लाउद्दीन शेख यांची सुकन्या डॉ. अमरीन शेख व औसा येथील रहिमुद्दीन शेख यांचे चिरंजीव अरबाज शेख यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नूतन वधू-वरांना पुढील सुखी व आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोईज शेख, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, माजी नगरसेवक इमरान सय्यद, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, बाभळगाव उपसरपंच गोविंद देशमुख, आर्वीचे उपसरपंच सचिन सुरवसे, नांदगावचे सरपंच महादेव ढमाले, विलास भोसले आदीसह शेख कुटुंबीय मित्रपरिवार काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!