हसाळा सोसायटीवर सलग चौथ्यांदा चेअरमन पदी शिवाजीराव हांडे यांची निवड
औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील हसाळा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणूकीत शेतकरी विकास पॅनल विजयी होऊन सलग चौथ्यांदा चेअरमन पदी शिवाजीराव माधवराव हांडे तर व्हाईस चेअरमन पदी शशिकांत अण्णासाहेब पवार यांची सहाय्यक निंबधक कार्यालय औसा येथे निवड झाली. या निवडी बद्दल शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार केला हसाळा सोसायटी ही हसाळा,जमालपूर, शिंदाळा असे तीन गावची सहकारी संस्था आहे.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम. व्ही. कात्रे यांनी काम पाहिले. यावेळी संचालक रमेश लातूरे, विलास हांडे, सुरेश पवार,शब्बीर पठाण, शंकर पवार, जीवनराव हांडे, अशोक एकंबे, मिनाबाई पाटील, राहीमुन्नबी पटेल, नवनाथ लोकरे, वसंतीबाई होळकर हे उपस्थित होते. या निवडीसाठी विलासबापू पवार, अण्णासाहेब हाडूळे, रवींद्र पाटील, बालाजी साळुंके, भुजंगराव पाटील, भाऊसाहेब लातूरे, सुधाकर लातुरे, सुरेश काळे, शिवदास सारंगे यांनी सहकार्य केले.