23 वा कारगील विजय दिवस साजरा

23 वा कारगील विजय दिवस साजरा

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे शहीद युध्द स्मारक याठिकाणी शहिद सैनिकाच्या बलिदानाची कृतज्ञता व्यक्त करणे व श्रध्दांजली वाहण्यासाठी 23 व्या कारगील विजय दिवस समारोहाचे आयोजन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमार्फत करण्यात आले होते.

सदर कार्याक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार ढगे, कमांडर कैलास गिरवलकर (नि.) नौसेना मेडल, माजी मेजर व्ही.व्ही. पटवारी, भारतीय माजी सैनिक संघटना लातूर यांचे पदाधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे सर्व कर्मचारी, माजी सैनिक व विरपिता यांच्या उपस्थितीत दि 26 जूलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता साजरा करण्यात आला. तसेच शहीद जवान लांडगे गणपती सुरेश यांच्या कुटुंबियांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

About The Author

error: Content is protected !!