वृक्ष लागवडीत दयानंद कला महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

वृक्ष लागवडीत दयानंद कला महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्याचे पर्यावरण समृध्द करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत दयानंद कला महाविद्यालयातील ४४६ विद्यार्थी प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनात मोलाचे योगदान दिले.

दि. २४ जुलै २०२२ रोजी एकाच वेळी वृक्ष लागवड करून मांजरा नदीकाठी दहा किलोमीटरची मानवी साखळी करत २८ हजार झाडे लावण्यात आली. भांतगळी येथे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व उप्रप्राचार्य अनिलकुमार माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. वृक्षारोपण करत असताना विविध स्फूर्ती गीते आणि घोषणांनी आसमंत निनादून गेला. या स्फूर्ती गीत आणि घोषणांनी विद्यार्थ्यांत नवचैतन्य निर्माण झाले आणि वृक्षारोपणाच्या कार्यास गती मिळाली. याबरोबरच दयानंद कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य हे विशेष आकर्षण ठरले. पथनाट्यात ज्योतिबा बडे ,सुदाम साठे, योगेश पोटभरे, आनंद खलुले यांनी सहभाग नोंदविला.

वृक्ष लागवडीत दयानंद कला महाविद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

यावेळी पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे,मराठी विभाग प्रमुख डॉ. शिवाजीराव जवळगेकर, डॉ. सुनील साळुंके, डॉ.संतोष पाटील, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.सुभाष कदम, डॉ. मच्छिंद्र खंडागळे, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ.संदीपान जगदाळे, प्रा.विलास कोमटवाड, प्रा.विवेक झंपले, प्रा महेश जंगापल्ले, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक व ४४६ विद्यार्थी आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद भाऊ सोनवणे, उपाध्यक्ष ललितभाई शहा, रमेशकुमार राठी, सचिव रमेशजी बियाणे, संयुक्त सचिव सुरेश जैन, कोषाध्यक्ष संजयजी बोरा यांनी प्रोत्साहन दिले.

About The Author