संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत द्यावी

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत द्यावी

आ.धिरज देशमुख यांची मागणी; पिकांचे नुकसान डोळ्यांत पाणी आणणारे

लातूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे ‘लातूर ग्रामीण’मधील अनेक गावांतील शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे झालेले पिकांचे नुकसान प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणणारे आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना आता राज्य सरकारने भरीव मदत करून दिलासा देण्याची गरज आहे, अशी मागणी आ.धिरज देशमुख यांनी येथे केली.

लातूर तालुक्यातील बामणी आणि आजूबाजूच्या नुकसानग्रस्त गावांना आ.धिरज देशमुख यांनी दि. 26 जुलै रोजी भेट देऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा मांडत ‘सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करावा’, अशी मागणी केली. या मागणीची सरकारने त्वरित दखल घ्यावी आणि आपल्याला आर्थिक मदत करावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे आ.धिरज देशमुख यांनी शेतकरी बांधवांना सांगितले.

एकीकडे गोगलगायींचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे सततचा पाऊस यामुळे शेतकरी बांधव त्रासून गेला आहे. पावसामुळे अनेकांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. पिके, भाज्या भुईसपाट झाले आहेत. कुजले आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी बांधवांना सरसकट मदत देणे आवश्यक आहे, असे आ. धिरज देशमुख यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार, मंडळ अधिकारी गवळी, कृषी अधिकारी सतीश कोरे, कृषी सहाय्यक विशाल झांबरे, तलाठी वाडवरकर, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय हट्टे, सचिन बंडापल्ले, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, रघुनाथ शिंदे, भातांगळीचे सरपंच परमेश्वर पाटील, बामणीचे सरपंच वैजनाथ दिवटे, उपसरपंच संजय ठाकूर, लातूर तालुका ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानोबा गवळे, आत्माराम माडे, विपीन गवरे, नारायण पाटील, प्रवीण मुचाटे, राजकुमार करपे, राजकुमार बोळंगे, लक्ष्मण गोकुळे, प्रवीण मुचाटे, कमलाकर बनसोडे, मारोती शिंदे, पवन बोजे, अरुण वीर, बाळू चिंते, पंढरीनाथ गवरे, मुजावर रहीम, जनार्दन गवरे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना फोन करून दिला धीर

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत द्यावी

बामणी आणि आजूबाजूच्या नुकसानग्रस्त गावांना भेट दिल्यानंतर अशीच परिस्थिती चिकलठाणा, भातांगळी, ममदापूर, भातखेडा, भाडगाव, कासारखेडा येथेही असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार धिरज देशमुख यांना सांगितले. तेव्हा त्यांनी लगेचच त्या त्या भागातील शेतकरी बांधवांना फोन करून नुकसानीची माहिती घेत त्यांना धीर दिला.

About The Author