शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण काळाची गरज – आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगिले) : कोणत्याही एका व्यक्तीच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या शाश्वत विकासासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे. असे विचार माजी राज्यमंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील मिशन उदगीर ग्रीन च्या वतीने आयोजित ईदगाह मैदानावर 100 मोठमोठी वृक्ष लागवड करण्यात आली याप्रसंगी बोलत होते.
यावेळी तहसीलदार रामेश्वर गोरे, उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, ईदगाह कमिटीचे अध्यक्ष रफी फा, मुजीब खतीब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना बनसोडे म्हणाले की, वृक्षारोपण आणि संगोपन काळाची गरज बनली आहे. वृक्षापासून सजीव सृष्टीला जगण्यासाठी ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजनची कमतरता कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात मानवाने पाहिली आहे, त्या गोष्टीचे गांभीर्य डोळ्यासमोर ठेवून वृक्षारोपणाला प्राधान्य द्यावे. असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी रफी कुरेशी, बाबा खादरी, साजिद पटेल, पप्पू भैया यांनी झाडे दान दिली. मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांच्या वतीने ईदगाह मैदानावर वृक्षारोपण करण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात खड्डे खोदण्यात आले. मिशन उदगीर ग्रीन टीमच्या वतीने याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव मुळे, शेख समीर, हबीब उस्ताद, अब्दुल हबीब, शेख हिसामुद्दीन, डॉक्टर शफिक, शेख इरफान, सय्यद ताहेर हुसेन, दूराणी आझहर खान,शेख अब्दुल गफार, मझहर पटेल, शेख हमीद, साहब असलम कादरी, मुजाहिद दायमी, शेख मुदासिर,इफतेकार शेख, डॉ.इर्शाद,पठाण फेरोज,मोमीन अझहर अमीर पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.