पीक विमा भरण्याची तारीखत वाढ करावी – बसवराज रोडगे
उदगीर (प्रतिनिधी) : खरीप हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत विमा प्रस्ताव सादर करण्याची दि. 31 जूलै 2022 ही अंतिम मुदत आहे.परंतु मागील पंधरा ते वीस दिवसापासून पाऊस आसल्यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी अडचण व तांत्रीक अडचणी निर्माण झाल्यामुळे
,अशा संभाव्य अडथळ्याची शक्यता विचारात घेऊन या योजनांचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी पीक विमा भरण्याची तारीखत १५ आगष्ट पर्यंत वाढ करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे उदगीर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे यांनी केली.
मागील आनेक वर्षापासून केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना चालू केली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र व राज्य शासनाने मुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमण्यात फायदा झाला आहे.प्रतिवर्षप्रमाणे या वर्षी विमा भरण्याची सुरवात झाली.विमा भरण्याचा सुरवातीपासून पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेत जाण्यासाठी अडचण निर्माण झाली. व त्यामुळे बँकेत मोठ्या प्रमाणत गर्दी होत आहे व त्याच बरोबर आँनलाईन विमा बरताना नेट चा प्रब्लोंम येत अस्यामुळे विमा भरण्यास १५दिवसाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी भाजपचे तालुकध्यक्ष बसवराज रोडगे यांनी केली आहे.