धानोरा सोसायटीच्या चेअरमनपदी पाटील तर व्हाइस चेअरमनपदी कुलकर्णी यांची निवड

धानोरा सोसायटीच्या चेअरमनपदी पाटील तर व्हाइस चेअरमनपदी कुलकर्णी यांची निवड

औसा (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरा येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे संपूर्ण उमेदवार विजयी झाले आहेत. धानोरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी विक्रम पाटील, व्हाईस चेअरमनपदी मनोज कुलकर्णी, स्वीकृत संचालक पदी रणजित कोळपे यांची निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त संचालक मंडळाची चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीची पहिली सभा दिनांक 26 जुलै रोजी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. मनिषा कात्रे यांच्या उपस्थित संपन्न झाली या सभेत चेअरमनपदी विक्रम जगन्नाथ पाटील तर व्हाईस चेअरमनपदी मनोज धोंडोपंत कुलकर्णी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. शेतकर्‍यांच्या वतीने नवनियुक्त चेअरमन व्हाईस चेअरमन, संचालक यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित संचालक अरविंद कोळपे, बाबासाहेब देशमुख, शरद सोमवंशी, आकाश कास्ते, ज्ञानोबा कोळपे, राम कोळपे, विनायक क्षेत्रफाळे, किरण सोमवंशी, सह तंटामुक्त अध्यक्ष संजीव सोमवंशी सरपंच सुरेश मुसळे, उपसरपंच नागेश कोळपे माजी सरपंच बब्रुवान पाटील, बालाजी जन्मले, सुदर्शन सोमवंशी आदी उपस्थित होते .

About The Author