शेतकऱ्यांना जिल्हा बँक सहकार्य करणार – माजी मंत्री दिलीपराव देशमुख

शेतकऱ्यांना जिल्हा बँक सहकार्य करणार - माजी मंत्री दिलीपराव देशमुख

हिप्परसोगा सोसायटी नवनिर्वाचित संचालक मंडळाने घेतली सदिच्छा भेट

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे धोरण बँकेने स्वीकारले आहे शेतकरी सभासद यांना मदतीसाठी सदैव तत्पर सेवा देत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्याची भूमिका घेतली असून सर्वांना सोबत घेऊन बँकेची दैदिप्यमान वाटचाल सुरू आहे अशी माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी येथे बोलताना दिली ते मंगळवारी औसा तालुक्यातील हिप्परसोगा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार त्रिंबक बनाना भिसे. जिल्हा बँकेचे संचालक अँड श्रीपतराव काकडे , संचालक स्वयंप्रभाताई पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे, व्हाइस चेअरमन श्याम भोसले, सचिन दाताळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिलीपराव देशमुख यांनी स्वयंप्रभाताई पाटील यांचे तिस-यांदा विजयी झाल्याबद्दल कौतूक केले. एक महीला सहकार क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत आहे याचे कौतूक केले. बँक सदैव शेतक-यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही यावेळी दिली.

यावेळी हिप्परसोगा येथील नवनिर्वाचित संचालक विठ्ठल सोमवंशी, चंद्रशेखर सोमवंशी, धोंडीराम आळंदकर, भगवान आळंदकर, भारत आळंदकर, अमोल पाटील, राम संपते, सुवर्णा यादव, पार्वती सोमवंशी, नागनाथ मुस्के, दामू चित्तापुरे, ज्ञानेश्वर पाटील, कैलास पाटील, हेमंत पाटील, सचिन पाटील, जगदीश यादव, चतुर्भुज सोमवंशी, सुभान पाटील, महादेव सोमवंशी, तुकाराम सोमवंशी, पांडुरंग पाटील, सचिन आळंदकर, बळवंत पाटील, अविनाश पाटील, अजय आळंदकर, शरद सुर्यवंशी, धनंजय यादव, दत्तासाहेब सोमवंशी, हर्षवर्धन पाटील, विशाल पाटील, विनोद अळंदकर, विठ्ठल यादव, गंगाराम गोरे, अप्पा सोमवंशी आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थीत होते.

About The Author