प्लॅस्टिक बंदी निर्णयातून पेपर पत्रवाळी, कप, द्रोण वगळा

प्लॅस्टिक बंदी निर्णयातून पेपर पत्रवाळी, कप, द्रोण वगळा

पेपर डिस्पोजेबल असोसिएशन शिष्टमंडळाची माजी मंत्री आ.अमित देशमुख यांच्याकडे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांची आज बुधवार दि. २७ जुलै रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर जिल्ह्यातून आलेल्या नागरीकांच्या भेटी घेतल्या, सर्वांच्या समस्या जाणून घेऊन सोडवण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. यावेळी लातूर पेपर डिस्पोजल असोसिएशनच्या शिष्टमंडळासह विविध संस्था संघटना पदाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन त्यांची निवेदने स्वीकारली. पेपर डिस्पोजेबल असोसिएशन लातूर जिल्हा शिष्टमंडळाने राज्य सरकारने प्लास्टिक बंदीबाबत तात्काळ निर्णय लागू न करता थोड्या कालावधीनंतर निर्णय लागू करावा, त्यांच्या समस्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. व्यापाऱ्याजवळ सध्या शिल्लक माल आहे, बँक लोन, रोजगार, व इतर अडचणी व्यापाऱ्यांना आहेत, त्यामुळे सवलत द्यावी व प्लास्टिक बंदी या निर्णयातून कागदी पत्रवाळी, द्रोण, पेपर कप यांना वगळण्यात यावे, अशीही विनंतीचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना निवेदन सादर केले. यावेळी माजी मंत्री आमदार देशमुख यांनी योग्य तो सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सूचना मनपा आयुक्तांना केली व याबाबतीत राज्य सरकारकडे पाठपुरावा करून योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, पेपर डिस्पोजेबल असोसिएशन लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरज बांगड, उपाध्यक्ष सुमुख गोविंदपूरकर, सचिव कैलास राचटे, उपाध्यक्ष सुभाष टेकाळे, कोषाध्यक्ष उमाकांत बटटेवार, रुपेश अग्रवाल रामचंद्र सोनी, पवन लड्डा, अक्षय कटारिया, संतोष साळुंखे, भरत वट्टमवार आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author