शेतपिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्वरित हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी !
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये मागील २५ दिवसांत सतत पडणारा पाऊस अतिवृष्टी, गोगलगाई यामुळे सोयाबीन, उडीद, मुग, कापूस इत्यादी पिंकासह, भाजीपाला व फळबागांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे गोगलगायीने सोयाबीन, मुग, उडीदांचे पीक फस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता येत नाही. शेतकरी बांधवांच्या शेतमालाला जी.एस.टी लागु केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. गॅसचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्याचे बजेट कोलमडले आहेत. गॅसचे दर त्वरीत कमी करण्यात यावेत. अतिवृष्टी व गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन त्वरीत हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी व शेतमालाला लावण्यात आलेली जी.एस.टी रद्द करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांना देण्यात आले आहे
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, निवृत्तीराव कांबळे, अजहर बागवान, माधवराव जाधव, डि.के जाधव, शिवाजीराव खांडेकर, तुकाराम पाटील, वसंतराव शेटकार, प्रशांत भोसले, बाळासाहेब साखरे, बाबासाहेब आबेगावकर, अविनाश देशमुख,आर.आर पाटील, सय्यद अजहर, इमरोज पटवेकर, जावेद बागवान, दयानंद पाटील, विनायक शिंदे, नाजीमभाई, शेखर चौधरी, गोपीनाथ जायभाये,अविनाश देशमुख, तानाजी राजे, बापूराव सारोळे, महेश कानगुले, अफरोज, नबी सय्यद,, फिरोज शेख, इलियास सय्यद,पिराजी कछवे, महाजन नागेश, अनिल बेंबडे, मेजर पाशाभाई, संग्राम पवार, अनिल बेंबडे, सचिन पाटील, मुन्ना सय्यद, ॲड.सादिख शेख, हुसेन मणियार,संभाजी चोपणे,बाळु शेळके, सादिक शेख, बागवान सय्यद, सलीम भाई, बाळू पवार, किरण बारमाळे तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते