तालुक्यातील होत असलेल्या अवैध वाहतुकीला पाठबळ कोनाचे?
किनगाव बस स्टँड मधुन खाजगी वाहनाव्दारे केली जात आहे अवैध प्रवासी वाहतूक
अहमदपूर (गोविंद काळे) : किनगाव ते चिखली,आंधोरी, किनगाव ते अहमदपूर पोलीस स्टेशन समोरून जाणाऱ्या कोंबुन प्रवासी भरलेल्या वाहनाकडे किनगाव पोलिसांचे चक्क दुर्लक्ष अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यावर अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे .पोलीस प्रशासन आणि नियमबाह्य खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे सबंध इतके मधुर आहेत की जणूकाही वाहतूक पोलिसांकडुन खाजगी वाहतूकदारांना कोणताही धोका होऊ शकणार नाही असे चित्र दिसून येत आहे.
अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळ कडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. बसची अपुऱ्या फेऱ्याची संख्या प्रवाशाच्या सोयीनुसार बसची सेवा नसणे आणि तीन – चार तास एकही बस नसणे तर दिवसभरातून केवळ एकदाच बस असणे असे प्रकार ग्रामीण भागात असल्याने प्रवासी वैतागून खाजगी वाहतुकीकडे वळतात बसस्थानक परिसररात खाजगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा असतो. दलाल बसस्थानकातून प्रवासी पळवतात प्रवाश्यांच्या दृष्टीने सोयीची वाटणारी खाजगी प्रवासी वाहतूक धोकादायकही आहे. तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून प्रवासी कोंबून भरलेले असतात. एका टॅक्सीत पंधरा ते वीस जण कोंबुन बसवलेले असतात. वाहनांची तपासणी होणार असल्याने चालकांना आधीच कळलेले असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित पणे तपासणी मोहीम सुरू केल्यास तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसू शकेल. किनगाव ते अहमदपूर ,किनगाव ते चिखली आंधोरी या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतुक होत असून प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसवून ही वाहतूक केली जाते अनेकदा प्रवासी थेट टॅक्सीला मागे लटकून किंवा टपावर बसवून वाहतूक होताना दिसते. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे यदाकदाचित अपघात झाला तर सबंधिताकडून कार्यवाहीचे नाटक होते त्यानंतर जैसे थे चे चित्र पहावयास मिळते. अहमदपूर तालुक्यातील ग्रामीन भागात होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालून सबंधित वाहन चालकांवर कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील सुजान नागरीकाकडून जोर धरत आहे.