नांदेड विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळतंय – रामराजे काळे

नांदेड विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळतंय - रामराजे काळे

लातूर (प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची परीक्षा पद्धत विद्यार्थी हित लक्षात घेऊन अवलंबली गेली नाही, त्यामुळे त्याचा परिणाम BCom तृतीय वर्षाच्या लागलेल्या निकालामध्ये दिसून आला. विद्यापीठातील Bcom शाखेतील तृतीय वर्षातील 6876 विद्यार्थ्यांपैकी 3794 विद्यार्थी नापास झाले आहेत.असाच निकाल याच शाखेतील प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा लागला आहे. तृतीय वर्षातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येते. याबाबतची पूर्व कल्पना परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर कुलगुरू महोदय व तत्कालीन शिक्षणमंत्री उदय सामंत यांना विद्यार्थी काँग्रेस चे उपाध्यक्ष उपाध्यक्ष रामराजे काळे निवेदनाद्वारे दिली होती. परंतु कसल्याही प्रकारचा सकारात्मक विचार करून विद्यापीठाने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला नाही. उर्वरित बीएस्सी, बीए, एमएससी, एमए इत्यादी व अशा अनेक कोर्सचे निकाल अशाच प्रकारे लागण्याची दाट शक्यता आहे.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एक, दोन विषयांमध्ये नापास झाल्यामुळे वाया जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी लागल्या आहेत, तर अनेक विद्यार्थ्यांना नामांकित विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारावर प्रवेश मिळत आहे. परंतु नापास झाल्यामुळे विद्यार्थी मानसिक त्रासामध्ये मध्ये दिसून येत आहे,जर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर त्याला विद्यापीठ प्रशासन शासन जबाबदार असेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या ग्रेस मार्क देऊन पास करण्याच्या सूचनेचे पालन सुद्धा विद्यापीठाकडून झाले असा संशय विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

मुंबई विद्यापीठाचे पेपर ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने झाले, महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा बहुपर्यायी पद्धतीने झाल्या, पुणे विद्यापीठाने कंबाईन पासिंगचा निर्णय घेतला, परंतु नांदेड विद्यापीठ सूडबुद्धीने जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना नापास करण्याचा प्रयत्न करत आहे का काय ? असा प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला आहे.

तरी मुख्यमंत्री यांनीनी यावर विचार करून, अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर नापास झालेल्या विषयांची पुनर्परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष रामराजे काळे यांनी केली.

About The Author