माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा वाढदिवस सामाजिक व धार्मिक कार्यक्रमानी उत्साहात साजरा

माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा वाढदिवस सामाजिक व धार्मिक कार्यक्रमानी उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा 61 वा वाढदिवस अहमदपूर तालुक्यातील प्रत्येक गावात वृक्षारोपण व ग्रामदैवताचे पुजन करून मोठ्या उत्साहात सामाजिक व धार्मिक कार्यक्रम घेऊन कार्यकत्यांनी साजरा केला. सकाळी 8 वाजता तालुक्यातील जाज्वल्य असलेल्या परचंडा येथील रोकडोबा देवस्थानचे पुजन माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले यावेळी रोकडोबा संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने 61 किलोचा खोबऱ्याचा हार घालून माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे ह.भ.प.किशन महाराज घोगरे, सरपंच शिवशंकर हिप्परगे, भारत शेळके,जिवण कापसे व ग्रामस्थांनी अभिष्टचिंतन केले.

यावेळी काजळहिप्परगा येथील सुखमणी वृद्धाश्रमात शंकर मुळे यांच्या पुढाकाराने अन्नदान करुन सर्व निराधार वृद्धा सोबत वाढदिवस साजरा केला तर तालुक्यातील तळेगाव येथील हनुमान मंदीरात जाऊन विनायकराव पाटील यांनी आरती केली तदनंतर अहमदपूर येथील सानवी मंगल कार्यालयात रायगड मित्र परिवाराच्या वतीने अहमदपूर नगर परिषदेच्या स्वच्छता विभागातील सर्व महीलानां साड्यांचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 61 रक्त दाण्यांनी रक्तदान केले.भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करण्यात आले. शाल,हार,फेटा यावरील होणारा व्यर्थ अणाठाई खर्च्याला बगल देऊन गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी शैक्षणिक साहीत्याची माजी मंत्री विनायकराव पाटील यांना भेट देऊन एक आगळेवेगळे अभिष्टचिंतन यावेळी केले.

यावेळी काँग्रेस, शिवसेना,रिपाई, विविध संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी, डॉक्टर, सर्व खात्याचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी माजी सदस्य, नगरसेवक तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच व सोसायटीचे चेअरमन व सदस्यांसह भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित होते. यावेळी संयोजन समितीचे, अँड.निखील कासनाळे, अँड.अमित रेड्डी, सुधीर गोरटे, निळकंठ पाटील, रामभाऊ नरवटे, रामभाऊ बेल्लाळे, गोविंदराव गिरी, राजकुमार खंदाडे, इतीराज केंद्रे, राहुल शिवपुजे, अँड.किशोर कोरे, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, मुन्ना कांबळे, पांडुरंग गलाले, गणेश हालसे, देविदास सुरनर, उमाकांत कासनाळे, धनराज पाटील, शंकर मुळे, बबलू पठाण, संगम कुमदळे, आसीफखाॅ पठाण,उद्येन पठाण यांच्या सह अनेकांनी सामाजिक व धार्मिक कार्यक्रम घेऊन माजी मंत्री विनायकराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.

About The Author

error: Content is protected !!