साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !
अहमदपूर (गोविंद काळे) : देशाचा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, गोवामुक्तीचा संग्राम, सामाजिक विषमतेविरुद्धची लढाई अशा प्रत्येक संघर्षात सक्रीय भूमिका पार पाडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ओ.एल किनगावकर साहेब, गणेशदादा हाके पाटील, जि.प सदस्य माधवराव जाधव, शिवानंद तात्या हेंगणे, ॲड.आर एस वाघमारे, ॲड. टी एन जि कांबळे, उत्तमरावजी माने, पोलीस उपनिरीक्षक अंधोरिकर, सुनील डावरे, आशिष तोगरे, माधव समुखराव, प्रकाश ससाणे, शेषेराव ससाणे, भानुदास गायकवाड, बजरंग गायकवाड, बनसोडे, अण्णाराव सूर्यवंशी ,जगनाथ वाघमारे,आदी मान्यवर उपस्थित होते.