साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून आत्मभान जागृत केले.!
अहमदपूर (गोविंद काळे) : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महान साहित्यिक होते. त्यांनी आपल्या साहित्यातून येथील दलित,शोषित,वंचित, उपेक्षित या वर्गाचे आत्मभान जागृत करण्याचे महान कार्य केले आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले.अहमदपूर शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती समितीच्या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोकरावजी केंद्रे,माजी नगरसेवक युवक नेते डॉक्टर सिद्धार्थकुमार सूर्यवंशी नगरसेवक राहुल शिवपुजे,अँड. अमितभैय्या रेड्डी,अँड. किशोर कोरे,कार्यकारी सभापती प्रशांत जाभाडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक केदार, उमेद पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहूजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पुढे बोलताना विनायकराव पाटील म्हणाले की,आज खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे यांचा विचार समाजाला तारणारा आहे.त्यांचे स्वाभिमानी विचार युवकांनी अंगीकारने ही काळाची गरज असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.यावेळी युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, लहुजी क्रांती सेनेचे प्रवक्ते प्राध्यापक कांबळे सर यांची समायोजित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष मुकुंद वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक नेते गिरीश गोंटे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे विशाल डावरे, सुरेश कसबे, आनंद शिंदे, राजेंद्र मेकाले, अभय शिंदे, आकाश डावरे, तिरुपती वाघमारे, सुमित वाघमारे, आदित्य डावरे, श्याम डावरे, अविनाश वाघमारे,अनिल वाघमारे आदींनी पुढाकार घेतला.