कासार सिरसी येथील बस स्थानक उभारणीच्या कामाला सुरुवात
आमदारांनी दिलेलं वचन पूर्ण केले
कासार सिरसी (बालाजी मिलगीरे) : येथे श्रावणच्या मुहूर्तावर पहिला सोमवारचा योग साधून मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेला भव्य दिव्य असा बस स्थानक उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आले आहे.
कासार सिरसी परिसरातील नागरिकांचे व प्रवाशांचे अडचण लक्षात घेऊन औसा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी आमदार होण्याच्या अगोदर बस स्थानक उभारण्याचा वचन येथील जनतेला दिलेला होता ते पूर्ण करत असल्याचे दिसत आहेत.
विकास पुरुष लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या आदेशानुसार स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने बस स्थानक नियोजित जागा साफ करून मारकाउंट घालून रांगोळी टाकून पदाधिकारी च्या हस्ते भूमिपूजन नारळ फोडून उदघाटन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाल्याच्या थोड्या दिवसातच या भागातील विकास कामाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे याहीपुढे अन्य प्रलंबित असलेल्या विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होतील अशी आशा येथील जनता लावून बसली आहे.
या भूमिपूजना वेळी भारतीय जनता पार्टी संघटक धनराज होळकुंदे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी जिलानीभाई बागवान, राजु डोणगापुरे ग्रामपंचायत सदस्य गोरख होळकुंदे, विठ्ठल गुत्ता, अनिस बेडगे, मंडळ उपाध्यक्ष भास्कर पाटील,अनुसूचित जाती संदीप बनसोडे , गुत्तेदार मुकेश जाधव, किरण किवडे, धोंडीराम बिराजदार ,रायप्पा मंडले, साहेबा कानडे, पत्रकार ज्ञानेश्वर मडोळे, उमेश बुकले आनंद देवसाळे शंकर स्वामी, नागनाथ स्वामी फारुख भगवान, मोहन बरकंबे अन्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.