नीळकंठ देवस्थानास सर्व प्रकारची मदत करणार – माजी मंत्री दिलीपराव देशमुख

नीळकंठ देवस्थानास सर्व प्रकारची मदत करणार - माजी मंत्री दिलीपराव देशमुख

नीळकंठ येथील स्वयंभू निळकंठेश्वराची माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते महापूजा संपन्न

लातूर (प्रतिनिधी) : गावातील विकास होण्यासाठी आता युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे गावांत हा विचार पुढे आल्याशिवाय प्रगती होणारं नाही असे सांगून नीळकंठ येथील युवकांनी पुढाकार घेतल्याने मंदिर परिसर चांगल्या प्रकारे तयार होत असून हा परिसर बघून इतर गावांना आदर्श घ्यावा असे काम या मंदिर विश्वस्त मंडळाने करावे असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी करून नीलकंठेश्वर मंदिर समितीला विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी येथे सोमवारी बोलताना दिली ते १ ऑगस्ट रोजी लातूर तालुक्यातील नीळकंठ येथील श्रीक्षेत्र स्वयं भू नीळकंठ मंदीरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते रुद्राभिषेक महापूजा करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शाम भोसले, रेणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, रेणा चे माजी चेअरमन संचालक यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे उपस्थित होते.

मांजरा साखर परिवाराने ३५ वर्षात एकच भाव काढला

या भागात तत्कालीन लोकनेते विलासराव देशमुख साहेब, अँड बिव्ही काळे यांनी मांजरा साखर कारखाना उभा केला त्यामुळे या भागात आर्थिक सुबत्ता मिळाली हे वास्तव्य चित्र हे करीत असताना लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी जी घडी बसवून दिली आहे त्याच पद्धतीनं अजूनही या साखर कारखान्याने सभासद बिगर सभासद याना एकच भाव दिलेला आहे ही परंपरा कायम राखली आहे ईतर जिल्ह्यांत वेगवेगळे उसाचे भाव निघतात पण आम्ही भेद भाव केला नाही येणाऱ्या काळात श्रीक्षेत्र नीळकंठ मंदीराच्या कामासाठी निधी लागेल ते आम्ही देवू त्यात कुठलीही कमतरता पडणार नाही असा शब्द देवुन मला इथे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नीळकंठश्वरांचे दर्शन मिळाले आशिर्वाद मिळाला माझं मी भाग्य समजतो असे सांगून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदतीसाठी जिल्हा बँक आपल्यासाठी सदैव तत्पर सेवेत आहे यावर्षी १७५o कोटी रुपये पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही असे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यावेळी म्हणाले.

काकांचा स्पर्शाने अनेक मंदिराचा जिर्णोद्धार – आ.धीरज देशमुख

लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जेव्हा माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब (काका) मंदिर परिसरात जातात तेव्हा तेथील मंदिर जीर्णोद्धार त्यांच्या स्पर्शाने अनेक मंदिर उभारली गेली असे सांगून मागच्या दोन वर्षात जिल्ह्यांत माजी मंत्री नेते आमदार अमीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात ५ हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणला गेला विकासाची दृष्टी ठेवून काम करत असताना या निळकंठ गावात विविध विकासकामांसाठी ८५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून भविष्यात विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले.

मांजरा साखर परिवाराचे ५७ लाख टन ऊस गाळप

लोकनेते विलासराव देशमुख साहेब बी.वी काळे साहेब, माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी रोपटे साखर कारखान्याचे लावले त्यांची इच्छा पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारी सारखी आपल्याकडे असावी अशी होती त्या दृष्टीने परिवारातील सर्व साखर कारखाने चांगले चालत आहेत योग्य भाव दिल्याने साखर कारखान्यामुळे आर्थिक क्रांती घडवून आणली यापुढील काळात आगामी अतिरीक्त उसाचे लागवडीचे नियोजन माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमीत देशमुख साहेब यांच्या नियोजनाखाली सुरु आहे असे सांगून येणाऱ्या काळात युवकांना विकास घडवू इच्छिणारे लोकांना संधी द्यावी. आपण निवडून देण्याची गरज आहे असे ते यावेळी म्हणाले. यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, महेश चव्हान यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी निळकंठ देवस्थानच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब आमदार धीरज देशमुख साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, विलास साखर कारखान्याचे संचालक अनिल बारबोले, धनंजय पाटील, जिल्हा काँग्रेस मीडिया चे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, मांजरा साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भिसे, जगदीश बावणे, अरुणदादा कुलकर्णी, रामदास पवार सतीश पाटील, तसेच नीलकंठ मंदिराचे विश्वस्त शिवदत्त औताडे, भुजंग औताडे, कमलाकर भुसारे, गणेश पुरी, युवराज औताडे, अक्षय चव्हाण, किरण शिंदे, शिवाजी आंबेकर, महेश औताडे यांच्यासह निळकंठ परिसरातील निळकंठ, मसला, तांदुळजा, भोसा, कानडी बोरगाव, भिसेवाघोली, बोरगाव येथील भक्त, शेतकरी, नागरिक ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author