जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी अर्ज पाठवा – नागनाथ बोडके

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणासाठी अर्ज पाठवा - नागनाथ बोडके

उदगीर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्हा परिषदेतील 66 जिल्हा परिषद गटातुन आणि सर्वच पंचायत समिती गणातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणुका लढवणे बाबत पक्षश्रेष्ठींनी सूचना केल्या आहेत. या निवडणुकांची सर्वस्व जबाबदारी जिल्हा अध्यक्ष या नात्याने नागनाथ बोडके यांच्यावर सोपवली आहे. तसेच स्थानिक पातळीवर समविचारी पक्षासोबत युती करण्याच्या अनुषंगाने देखील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी लवकरच जिल्हा पातळीवर सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे.
या बैठकीसाठी सर्वच सक्रिय सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे. तसेच जे उमेदवार इच्छुक आहेत, त्यांनी आपला गट आणि गण कशा पद्धतीने आरक्षित आहे. याचा अभ्यास करून आपल्या स्वतःबद्दल सविस्तर माहिती अर्थात बायोडाटा सह राष्ट्रीय समाज पक्षाकडे दोन प्रतीत अर्ज करावा. ज्या इच्छुक उमेदवारांचा जनसंपर्क दांडगा असेल, त्यांना निश्चित संधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहील. अशी ग्वाही राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांनी दिली आहे.
पक्षश्रेष्ठीने दिलेल्या सूचनांच्या आधारे समविचारी पक्ष सोबत युती झाल्यास तो निर्णय कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. निवडणुका लढवणे गरजेचे असले तरी युतीचा नियम आपण पाळला पाहिजे. त्या दृष्टीनेही पक्षश्रेष्ठी सोबत बोलणे चालू असून स्थानिक पातळीवरचे निर्णय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घ्यावेत. असा संदेश पक्षाचे सर्वेसर्वा माजी मंत्री जानकर साहेबांनी दिले आहेत.
संपूर्ण मतदारसंघाचा दौरा जिल्हा कार्यकारणी करणारच आहे, तत्पूर्वी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या गटात किंवा गणात चाचपणी करून आपल्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणे भाग पडल्यास काय परिस्थिती राहील? याचाही स्वतंत्र अहवाल तयार करावा. तो अहवाल देखील पक्षश्रेष्ठीकडे पाठवणे आहे. एकंदरीत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लढवू इच्छिणाऱ्यांनी विना विलंब संपर्क करावा. असेही आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांनी केले आहेत. कार्यकर्त्यांच्या माहितीस्तव जिल्ह्यातील आरक्षणाच्या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे देत आहे.
लातूर जिल्ह्यातील 66 जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये जाहिर करण्यात आली.

अहमदपूर तालुक्यातील 1- खंडाळी- अनुसूचित जाती, 2- हाडोळती- नागरिकांच्या मागास प्रवर्ग (महिला), 3- शिरुर ताजबंद -सर्वसाधारण महिला, 4- अंधोरी-अनुसूचित जाती महिला, 5-किनगाव -सर्वसाधारण (महिला), 6-सावरगाव रोकडा – अनुसूचित जाती, 7- कुमठा बु. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला).

जळकोट तालुक्यातील 8- वाजंरावाडा – सर्वसाधारण, 9- माळहिप्परगा – सर्वसाधारण (महिला).

उदगीर तालुक्यातील 10-घोणसी – सर्वसाधारण, 11- हंडरगुळी – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 12-वाढवणा (बु) – सर्वसाधारण, 13-नळगीर – सर्वसाधारण महिला, 14-नागलगांव- नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 15- मलकापूर – सर्वसाधारण ,16- लोहारा – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 17-देवर्जन नागरिकांच्या मागास प्रवर्ग , 18-निडेबन – नागरिकांच्या मागास प्रवर्ग.

देवणी तालुक्यातील 19- बोरोळ – सर्वसाधारण (महिला), 20-वलांडी -सर्वसाधारण महिला, 21-जवळगा सर्वसाधारण.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 22-येरोळ – सर्वसाधारण (महिला), 23-हिसामाबाद- अनुसुचिज जाती (महिला), 24-साकोळ – सर्वसाधारण.

चाकूर तालुक्यातील 25-झरी बु- – सर्वसाधारण , 26- चापोली – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 27-रोहिणा- सर्वसाधारण, 28-वडवळ ना. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 29-जानवळ-सर्वसाधारण (महिला), 30-नळेगाव –सर्वसाधारण (महिला).

रेणापूर तालुक्यातील 31-पानगाव – सर्वसाधारण (महिला), 32-खरोळा- सर्वसाधारण, 33-कामखेडा-सर्वसाधारण , 34 पोहरेगाव – सर्वसाधारण.

लातूर तालुक्यातील 35 महापूर- अनुसूचित जाती, 36-महाराणा प्रताप नगर-अनुसूचित (माहिला), 37-बाभळगांव – अनुसूचित जमाती (महिला), 38- पाखरसांगवी – सर्वसाधारण (महिला), 39-आर्वी-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 40-काटगाव – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 41-चिंचोली ब – अनुसूचित जाती, 42-तांदुळजा – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 43-मुरुड बू.-सर्वसाधारण, 44-निवळी – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 45-एकूर्गा – सर्वसाधारण (महिला).

औसा तालुक्यातील 46-भादा – अनुसूचित जाती, 47-आलमला- सर्वसाधारण, 48-हासेगाव-सर्वसाधारण, 49-खरोसा-अनुसूचित जाती, 50-लामजना अनुसूचित जाती (महिला), 51-‍शिवली -सर्वसाधारण (महिला), 52- उजनी- अनुसूचित जाती (महिला),53-आशिव – सर्वसाधारण (महिला), 54-मातोळा – सर्वसाधारण, 55 किल्लारी – अनुसूचित जाती (महिला).

निलंगा तालुक्यातील 56-पानचिंचोली – अनुसूचित जाती (महिला), 57-निटूर-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला), 58-अंबुलगा बू. – सर्वसाधारण, 59-हलगरा-नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 60-औराद शहाजनी – नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, 61-बोरसुरी – सर्वसाधारण, 62- दापका-सर्वसाधारण (महिला), 63-सरवडी-सर्वसाधारण, 64-मदनसुरी

-अनुसूचित जमाती, 65-तांबाळा -सर्वसाधारण (महिला), 66-कासार सिरसी –नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग (महिला).
या पद्धतीचे आरक्षणासून आपल्या गटातून कोण योग्य उमेदवार असेल याचाही सूचना कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांच्याकडे कराव्यात, अशा पद्धतीच्या सूचना पक्षश्रेष्ठीकडून देण्यात आले असल्याचेही याप्रसंगी नागनाथ बोडके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. समविचारी पक्ष सोबत आले तर ठीक, नाही आले तरीही संपूर्ण जागा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल. अशी ही माहिती या प्रसंगी नागनाथ बोडके यांनी दिली आहे.

About The Author