पंतप्रधान मोदीजी यांनी अण्णा भाऊंचा सन्मान वाढवला – माजी आ.भालेराव

पंतप्रधान मोदीजी यांनी अण्णा भाऊंचा सन्मान वाढवला - माजी आ.भालेराव

उदगीर (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान विकास पुरुष नरेंद्रजी मोदी यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करून 102 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचा सन्मान केला आहे. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चा गटाचा अध्यक्ष या नात्याने माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामार्फत आभाराचे पत्र दिले आहे.
मुंबई येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात फाईन आर्ट सभागृह येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सदरील आभाराचे पत्र माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चा विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकरराव भालेराव यांनी दिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्वच महापुरुषांचा सन्मान केला जात असल्याबद्दल भालेराव यांनी समाधान व्यक्त केले.

About The Author

error: Content is protected !!