कासार सिरसी वाडीत आमदारसाहेबांच्या प्रयत्नातून लोकमान्य टिळक, आण्णाभाऊ साठे, जयंती निमित्त मध्यान्ह भोजन सेवा सुरु

कासार सिरसी वाडीत आमदारसाहेबांच्या प्रयत्नातून लोकमान्य टिळक, आण्णाभाऊ साठे, जयंती निमित्त मध्यान्ह भोजन सेवा सुरु

कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : येथे औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या प्रयत्नातून लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे व क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त या दोन्ही महापुरुषांची जयंती साजरी करून मध्यान्ह भोजन सेवा सुरू करण्यात आले. आपल्या राज्यामधील कामगार, मजुरदार व गोरगरीब जनता कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही याची काळजी घेत, “”सन्मान कष्टाचा आणि आनंद उद्याचा”” ही संकल्पना मनी घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने व लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या प्रयत्नातून ही सेवा कासार सिरसी वाडी या गावी मध्यान्ह भोजन सेवाची गाडी येऊन भोजन वाटप करण्यात आले. येथील सर्व कष्टकरी, मजूरदार कामगारांनी या भोजनाचा स्वाद घेतले यापुढे या भोजनाचा स्वाद सर्व कामगारांनी घ्यावे असे विनंती अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. तसेच गावकऱ्यांच्या वतीने मध्यान्ह भोजन सेवा पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांचा व त्याच्या टीमचं गावकऱ्यांच्या वतीने फेटा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच गुरुनाथ पंदले, मुकुंद कोळसुरे,राजू भोसले, राहुल ईश्वरे, रायापा मंडले,कलापेसर अन्य गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!