मोरया ढोल ताशा व ध्वज पथकाचा वाद्यपूजन सोहळा संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : मोरया ढोल ताशा व ध्वज पथकाचा वाद्यपूजन सोहळा संपन्न झाला. वाद्यपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लातूर महानगरपालिका मा. नगरसेवक व भारतीय जनता पार्टी युवा अजितभैय्या पाटील कव्हेकर हे होते. त्यांच्या हस्ते आरती व गणपती पूजन करून वाद्यपूजन सोहळा पार पडला. आतुरता वाद्य पूजनाची ओढ लागली होती मनाला. हळदी कुंकू, दिवा वातीसह आज तो मुहूर्त काढला. टिळकांनी लोकसहभागातून लोकहितार्थ आणि आपली संस्कृती जोपासण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला त्या वाटेवर मोरया पथक काम करत आहे. आणि याचा दाखला मागच्या 10 वर्षापासून मोरया पथक देत आले आहे. जे कि संपूर्ण लातूरच नव्हे तर जवळपास मराठवाड्यासाठी आदर्शवादी आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचा महाराजा गणेश मंडळाचे सचिव राजेशजी लखादिवे, मोरयाचे ज्येष्ठ सल्लागार सूर्यवंशीकाका, प्रवीणअण्णा सौंदती, शांताई मंगल कार्यालयांचे मालक नितीनजी पडिले, महाराजा गणेश मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष रवीजी ओझा, मोरया पथकांचे संस्थापक अध्यक्ष आकाश पवार उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत पथकाच्या वतीने आकाश पवार, शुभम पाटील, महेश सूर्यवंशी, अमित सौंदती यांनी केले. तसेच या कार्यक्रमाला लातूरातील प्रसिद्ध अश्या धाडस ढोलताशा पथकाचे आनंद पांचाळजी व सेंट्रल हनुमान ढोल पथकाचे अंकित पंडितजी यांनीही उपस्थित लावली. मान्यवरांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले व आभारप्रदर्शन आकाश पवार यांनी व सूत्रसंचालन अक्षयजी कुलकर्णी, छायाचित्रण दीपक वाघमारे यांनी केला.
वाद्यपूजन सोहळ्याला श्रीकृष्ण गणेश मंडळाचे सदस्य पवन पवार, मनीष मोरे, अप्पा शेटे, वल्लभ कुलकर्णी, शैलेश राडकर व मोरया परिवाराचे विक्रांत देशमुख, श्रीराम गायकवाड, महेश आहेर, दत्ता फुले, गणेश उदगिरे, लक्ष्मी अर्जुने, प्रतीक्षा नांदे, तसेच मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण गणेश व मोरया पथकाचे सदस्य, महिला सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते.