समाज व राष्ट्रहितासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सकारात्मक काम करावे

समाज व राष्ट्रहितासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सकारात्मक काम करावे

अहमदपूर (गोविंद काळे) : सद्यस्थितीला पोलीस प्रशासनात कामाच्या प्रचंड व्यापामुळे अधिकाऱ्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात ताणतणावाचे वातावरण असल्याचे सांगून समाज व राष्ट्रहितासाठी पोलीस अधिकाऱ्याने निष्कलंक, कर्तव्यनिष्ठ व पारदर्शक दृष्टिकोन ठेवून काम करावे असे प्रतिपादन लोकनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. 31 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांच्या सेवापूर्ती निमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांचा सपत्नीक भव्य सत्कार सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते .यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे ,आमदार बाबासाहेब पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, जि प चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव केंद्रे, उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेनशेट्टी,सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम, तहसीलदार रामेश्वर गोरे, सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी श्रीधर पवार ,सेवानिवृत्त पोलीस अध्यीक्षक सुधाकर रेड्डी सह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे म्हणाले की बलराज लंजिले यांनी जीवनभर पारदर्शी व गोरगरीब, अन्यायग्रस्त ,लोकांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचे कार्य केल्याचे सांगितले. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले की राजकारणामध्ये सद्यस्थितीला चांगल्या चारित्र्यसंपन्न माणसांनी येण्याची गरज असल्याचे सांगून चांगल्या माणसाच्या कार्याची उंची अंत्यविधी व निरोपाच्या भावस्पर्शी सोहळ्याच्या निमित्ताने लक्षात येते असे सांगितले. यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, गणेशदादा हाके पाटील यांच्यासह प्रवीण फुलारी, अनिकेत कदम,विक्रांत गुजमगुंडे,रामभाऊ तिरुके, चितांबर कामठेवाढ,डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, प्रा. विश्वंभर स्वामी,सुशांत जगताप यांचे मनोगत पर भाषणे झाली. सेवापूर्ती निमित्त संयोजन समितीच्या वतीने बलराज लंजिले व सौ कविताताई लंजिले यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, वृक्ष देऊन उपस्थित मान्यवर व प्रशासनातील अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रामेश्वर कदम यांनी तर सूत्रसंचालन रामलिंग तत्तापूरे व प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांनी मांनले. प्रारंभी सजवलेल्या जीप मधून पोलीस स्टेशनच्या आवारा तुन बलराज लंजिले यांचा शहराच्या प्रमुख रस्त्यावरून मिरवणुक काढण्यात आली. यावेळी बलराज लंजिले आणि कविता लंजीले यांचा विविध राजकीय पक्ष, मित्रपरिवार,व्यापारी मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हृदयस्पर्शी सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड,पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण,सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बँकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार सह पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author