विद्यार्थ्यानी आरामदायी जीवनाचा त्याग करून कड्क शिस्तीचे पालन करावे – प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड

विद्यार्थ्यानी आरामदायी जीवनाचा त्याग करून कड्क शिस्तीचे पालन करावे - प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड

लातूर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते गाठण्यासाठी आरामदायी जीवनाचा त्याग करून कडक शिस्तीचे पालन करावे व मेहनत करावी असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांनी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना केले.

दयानंद कला महाविद्यालयात आयोजित इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ओळख महाविद्यालयाची या कार्यक्रमात बोलत होते. नुकताच महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लागला व इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. दयानंद कला महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची ओळख व्हावी या हेतूने त्यांच्यासाठी महाविद्यालयाची ओळख या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या अभिभाषनाने यावेळी करण्यात आली. या कार्यक्रमात इयत्ता दहावीत 90/ पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या एकुण 11 विद्यार्थ्यांनी कला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यामुळे त्यांचा प्राचार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे. तसेच प्रा. संजय कुलकर्णी उपस्थित होते. परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.गोपाल बाहेती यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व इयत्ता अकरावीतील नवप्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. संदिपान जगदाळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.दिनेश जोशी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रा.सुरेश क्षिररसागर यांनी मानले.

About The Author