लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील चिंचोली तपसे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती १ ऑगस्ट २०२२ रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावचे सरपंच विश्वंभर सुरवसे, उपसरपंच युवराज यादव, जिल्हा परिषद महेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे, प्रवीण कांबळे, सुरज मुळे, माजी सरपंच मारुती नेटके, सेवानिवृत्त सैनिक बब्रुवान सुरवसे, राजेश पाटील, सचिन गरड, पप्पू बिराजदार, आकाश मोरे, दिलीप नेटके, बालाजी शिंदे, पप्पादेवी लांडगे, माधव कांबळे, प्रमोद नेटके, प्रशांत नेटके यांच्यासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती तपसेचिंचोलीचे सर्व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
